Social Activity
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्लॅस्टिक निर्मुलन मोहिमे अंतर्गत कापडी पिशव्यांचे वा (Secondary School and Junior College, Bhilawadi)

भिलवडी  August 17,2022

   *सेकंडरी स्कूल भिलवडी च्या विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिक निर्मुलन मोहिमे अंतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप.* भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज, मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप गावातील नागरिकांना घरोघरी जाऊन करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन जेष्ठ विज्ञान शिक्षक विजय तेली यांनी केले. कार्यानुभव, संगणक, जलसुरक्षा विषयांतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातात. या नुसार पर्यावरण पुरक उपक्रम राबविले जातात. यासाठी प्लॅस्टिक निर्मुलन करणे गरजेचे आहे. या हेतूने कापडी पिशव्या विद्यार्थ्यांनी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुमारे बाराशे पिशव्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एस. एल माने, पर्यवेक्षिका सौ राजकुमारी यादव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पी. बी पाटील, एस. व्ही केंगार, राजीव आरते, तुषार पवार, सौ. एस. ए. यादव, अमृत पोतदार, सुरज पाटील, प्रमोद काकडे, विनोद सावंत,आदी शिक्षक उपस्थित होते.